Tuesday 18 October 2011

Technolya

संगणकाचा स्वभावधर्म आहे पिंगणे आणि
नेटवर्कचा गुणधर्म आहे पिंगवणे

एच ट ट पी प्रोटोकॉल ला स्टेटलेस राहून आला कंटाळा,
धरला कुकी चा हाथ आणि झाला स्ततेलेस मधून मोकळा

Sunday 25 September 2011

charolya

ग्रिश्मातल्या झाडाच असच असत,
फांद्यांचे भरून येतात हात
आणि पानांना गळाव लागत!

डोहाच्या हृदयात प्रेमाचं स्पंदन उमटल आणि
डूलक्या घेणाऱ्या काठावर, पाण्याचा एक तरंग हळुवारपणे थडकला,

चिमुकलं हसू डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करतोय,
जगण्याला नवीन अर्थ मिळाला म्हणून मन भरून येतंय
चिमुकलं हसू ओंजळीत साठवण्याचा प्रयत्न करतोय,
नवीन आशा, नवी पालवी, झाड पुन्हा बहरून येतंय

निरभ्र आकाशात, वाट चुकलेला पक्षी अचानक अवतरला,
निरागस चेहऱ्यावर खुदकन आलेलं हसू अलगद उमटलं

अळवावरचे थेंब, पानाशी सलगी ना करता,
पळभरच लकाकतात, पानाचा डौल वाढवतात,
पानाने समधानाने डोलता, टपकन गळून पडतात,
क्षणभंगुर जीवनालाही अर्थ देऊन जातात